vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली

 

नाशिक गुन्हे प्रतिनिधी

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन मुले आणि वडिलांचा समावेश आहे. या तिघांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास  घेऊन जीवन संपवलं. तिघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. घटनेची माहिती  मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

घटना रविवारी (दि.29) दुपारी तीन ते साडीतीन च्या दरम्यान घडली. दीपक शिरोडे (वय-55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय-25), लहान मुलगा राकेश शिरोडे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या बाप-लेकांची नावे आहेत. या तिघांनी घरातील वेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. (Nashik Crime)

दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉपजवळ फळ विक्री व्यवसाय करतात.
दरम्यान, पत्नी आणि आई या दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
त्या घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मात्र, आत्महत्येमागचे नेमकं कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करीत आहेत.

संबंधित पोस्ट

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

गुजरात विधानसभा निवडणुका 20 22: ‘नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया’; रवींद्र जडेजा ने केल बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ वायरल

vishwatmaklokswamivarta

येस बँकेत गुंतवणूक केलीय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

शिवसेनेचा आरोप, म्हणाले- मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

नाथषष्ठी यात्रा महोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक वारकऱ्यांना सुरक्षा,स्वच्छता आणि सेवा द्या- पालकमंत्री संदिपान भुमरे

vishwatmaklokswamivarta

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद