vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन, शंभरहून अधिक चित्रपटात काम केले …

अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन, शंभरहून अधिक चित्रपटात काम केले …

 

सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते जावेद खान अमरोही यांना श्रध्दांजली अर्पण करत आहेत. जावेद खान अमरोही यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

बॉलीवूड प्रतिनिधी

टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड अशा दीर्घ पल्ल्यावर अभिनयाच्या माध्यमातून आपली छाप उमटवणारे अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झाले आहे. जावेद खान यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘लगान’ (Lagaan) चित्रपटात साकारलेल्या राम सिंह या त्यांच्या भूमिकेचे जोरदार कौतुक झाले होते

सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते जावेद खान अमरोही यांना श्रध्दांजली अर्पण करत आहेत. जावेद खान अमरोही यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जावेद खान अमरोही यांचे ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे इंडिया’, ‘लगान’ हे काही गाजलेले अलिकडील काळातील चित्रपट. या चित्रपटांतील भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जातात. याशिवाय जावेद खान अमरोही यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनयाचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. ‘लगान’ चित्रपटाचा अभिनेता अखिलेंद्र मिश्रा याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून मुंबईत जन्मलेल्या जावेद खान अमरोही यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. अखिलेंद्र मिश्रा यांनी जावेद खान अमरोही यांचा फोटो शेअर करत लिहिले, ‘जावेद खान साहेबांना विनम्र श्रद्धांजली. सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्येष्ठ चित्रकार, EPTA चे सक्रिय सदस्य

जावेद खान अमरोही यांनी 1973 साली ‘जलते बदन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ‘नूरी’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘बाजार’, ‘रंग बिरंगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय कौशल्य दाखवले. जावेद खान अमरोही यांनी ‘मिर्झा गालिब’ या मालिकेसह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई येथील बेलापूर विभागातील 3 सोसायट्यांमध्ये ‘प्लास्टिकमुक्त सोसायटी’ विषयी जनजागृती

vishwatmaklokswamivarta

दि.२७ नोव्हेंबर ते दि.११ डिसेंबर २०२४ या कालावधीकरीता मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतलाभक्तांच्या सेवेचा आनंद

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta