vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले…

 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले…

[ मुंबई प्रतिनिधी: बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा शिंदे गट  हीच शिवसेना  असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने  गेल्या आठवड्यात जाहीर केलाय. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसह निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.

 

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला आहे. तर ठाकरे गटावर पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर आणखी एक पाऊल उचललं आहे. उद्धव ठाकरे गटाने यांनी शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असे दोन्ही नाव हटवले आहे. ट्विटर हँडल आणि वेबसाईट हे दोन्ही शिवसेनेच्या नावावर होते आणि ते ठाकरे गट हाताळत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रविवारी अचानक शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेल्याचे पाहायला मिळाले. तसेच या हँडलवर क्लिक केल्यानंतर रॉक अँड रोल असे नाव दिसत होते. या ट्विटर हँडलला दोघांनी फॉलो केले आहे. तसेच शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचे समोर आले होते. सुरुवातीला दोन्ही हॅक झाल्याची चर्चा होत होती. मात्र आता ठाकरे गटानेच हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

 

शिवसेनेच्या ट्विटरवरील ब्ल्यू टिक गेलं

 

ट्विटरने शिवसेनेच्या ट्विटर हँडलला व्हेरिफाईड करुन ब्ल्यू टिक दिलं होतं. व्हेरिफाईड असलेल्या शिवसेनेच्या ट्विटरचे हॅंडलचे हँडल नेम बदलल्याने ट्विटरने ब्ल्यू टिक काढून घेतलं आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग कसा केला जातोय यावरही चर्चा होणार आहे.” असं राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकांत शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाल्यावर राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे घेतले आहे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा…

vishwatmaklokswamivarta

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  च्या आमदाराची भाजपाच्या   आमदाराला ‘ऑफर’…

vishwatmaklokswamivarta

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*

 संयमी मुख्यमंत्र्याला हतबल पाहून जनताही भावूक; पाहा उद्धव ठाकरेंपोटी जनसामान्यांचं भारावून टाकणारं प्रेम