vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले…

 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले…

[ मुंबई प्रतिनिधी: बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा शिंदे गट  हीच शिवसेना  असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने  गेल्या आठवड्यात जाहीर केलाय. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसह निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.

 

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला आहे. तर ठाकरे गटावर पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर आणखी एक पाऊल उचललं आहे. उद्धव ठाकरे गटाने यांनी शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असे दोन्ही नाव हटवले आहे. ट्विटर हँडल आणि वेबसाईट हे दोन्ही शिवसेनेच्या नावावर होते आणि ते ठाकरे गट हाताळत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रविवारी अचानक शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेल्याचे पाहायला मिळाले. तसेच या हँडलवर क्लिक केल्यानंतर रॉक अँड रोल असे नाव दिसत होते. या ट्विटर हँडलला दोघांनी फॉलो केले आहे. तसेच शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचे समोर आले होते. सुरुवातीला दोन्ही हॅक झाल्याची चर्चा होत होती. मात्र आता ठाकरे गटानेच हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

 

शिवसेनेच्या ट्विटरवरील ब्ल्यू टिक गेलं

 

ट्विटरने शिवसेनेच्या ट्विटर हँडलला व्हेरिफाईड करुन ब्ल्यू टिक दिलं होतं. व्हेरिफाईड असलेल्या शिवसेनेच्या ट्विटरचे हॅंडलचे हँडल नेम बदलल्याने ट्विटरने ब्ल्यू टिक काढून घेतलं आहे.

संबंधित पोस्ट

फलटण शहराला ग्रीन सिटी बनवणार क्रीडा संकुलन शैक्षणिक संकुलन सुसज्ज दवाखाना- राकपा प्रमुख नेते अजित पवार

vishwatmaklokswamivarta

किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं म्हणत मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सेनेचे आदेश बांदेकर विरोध दर्शविला आहे

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आघाडीत  जागांचे वाटप पूर्ण झाले असले, तरी अनेक जागांवरील पेच कायम असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी…

महाराष्ट्रात ‘वादळ’ अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत; राऊतांचा भाजपला टोला..  

आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणींत वाढ? मंत्री शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांसंदर्भात मिळणार नोटीस