vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र राज्यातील परभणी येथील घटना : शौचालयाची टाकी साफ करताना पाच जणांचा गुदमरू मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक…

परभणी येथील दुर्दैवी घटना : शौचालयाची टाकी साफ करताना पाच जणांचा गुदमरू मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक…

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरात घडली. दरम्यान, एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतू, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे

शेतात असलेली शौचालयाची टाकी साफ करताना पाच जणांचा गुदमरुन  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना परभणी ) जिल्ह्यातील सोनपेठ  तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरात घडली. दरम्यान, एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतू, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. मात्र, त्यातील एकालाच जीवंत अवस्थेत रुग्णालयात दाखल करता आले.

पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी अत्यावस्थ असलेल्या सर्वांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी डॉक्टरांनी पाच जणांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. उर्वरीत एकावर परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये सर्वजण मजूर आहेत. शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज अशी या सर्व मृतांची नावे आहेत.

यांनी शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम घेतले होते. दुपारी तीन वाजलेपासून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. दरम्यान, टाकीची साफसफाई सुरु असताना मध्य रात्री अचानक त्यांना श्वास कोंडून गुदमरु लागले. योग्य प्रमाणात हवा आणि ऑक्सीजन मिळाले नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. हे सहा जण अत्यावस्थ असल्याचे उपस्थित नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने याबाबतची माहिती प्रशासनाला दिली. त्यांनंतर आरोग्य विभागाने भाऊचा तांडा येथे एक रुग्णवाहिका पाठवली आणि पीडितांना रुग्णालयात दाखल केले

रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद या पाच जणांना डॉक्टरांनी तपासले मात्र त्यांना उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे जाहीर केले. यापैकी जमीर शेख याची प्रकृती प्रतिसाद देत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना परळी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

 

 

 

संबंधित पोस्ट

जाफराबाद ते जालना मार्गे माहोरा-बरंजळा साबळे, नळणी बससेवा सुरु कराअन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण…

सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

यमाई देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू*

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा