vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जाफराबाद ते जालना मार्गे माहोरा-बरंजळा साबळे, नळणी बससेवा सुरु कराअन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचा इशारा

जाफराबाद ते जालना मार्गे माहोरा-बरंजळा साबळे, नळणी बससेवा सुरु कराअन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचा इशारा

जालना , प्रतिनिधी)- जाफराबाद ते जालना मार्गे माहोरा- बरंजळा साबळे -नळणी बरड- नळणी चौफुली समर्थनगर नळणी – जवखेडा ठोंबरे- केदारखेडा- राजुर-जालना) बस सेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी विभागीय नियंत्रकांना

दिलेल्या निवेदनात दिला आहे.एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सुरक्षित असणारी व सर्वांच्या जिव्हाळ्याची दळणवळण व्यवस्था म्हणून महाराष्ट्र शासनाचीराज्य परिवहन महामंडळ बस सेवा ओळखली जाते. समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकांसाठी महाराष्ट्राची शान म्हणून ही लाल परी ओळखली जाते. जाफराबाद ते जालना (मार्गे माहोरा बरंजळा साबळे नळणी वरड नळणी चौफुली समर्थनगर नळणी-

जवखेडा ठोंबरे -केदारखेडा- राजुर-जालना) ३५ वर्षांपूर्वी संपूर्ण रस्तेपक्के नसतांनाही ह्या मार्गावर दोन वेळेस बस फेर्‍या सुरू होत्या.आता रस्ते गुळगुळीत असून सुद्धा एसटी बस सेवा बंद असल्याने ३५ वर्षांपासून प्रवाशांची गैरसोय होत आहे; संबंधित मार्गावर येणार्‍या गावांची वाढती लोकसंख्या व व्यापारी दृष्टिकोनाचे महत्त्व लक्षात घेता तसेच न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय, धर्मादाय कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असे अनेक महत्त्वाचे मुख्य शासकीय कार्यालय जिल्ह्याचे ठिकाण असणार्‍या जालना शहरात असल्याने शासकीय काम किंवा वैयक्तिक

कामानिमित्ताने वाढणारी प्रवाशी संख्या तसेच उच्च शिक्षणाचे केंद्रअसणार्‍या जालना शहरात शिक्षण घेण्यासाठी वरील मार्गावरील जाणार्‍या विद्यार्थ्यांची होणारी अडचण तसेच जिल्ह्यातील सर्वांत मोठी जालना शहरात असल्याने रोजगाराची संधी येथे उपलब्ध असतांना वरीलमार्गावरील ग्रामीण भागातील युवकांना बस सेवा उपलब्ध नसल्याने रोजगार उपलब्ध असून सुद्धा त्याचा फायदा घेता येत नाही.अशा सर्व बाबीचा विचार केला तर दररोज साधारणता १०० ते १२५ प्रवाशी,विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, जाफराबाद ते जालना (मार्गे माहोरा- बरंजळासाबळे – नळणी बरड- नळणी चौफुली- समर्थनगर नळणी- जवखेडा ठोंबरे -केदारखेडा- राजुर- जालना) ह्या मार्गावर जाणे-येणे करिता बस सेवा उपलब्धनसल्याने ३५ वर्षांपासून प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वरील सर्व बाबीचे महत्त्वआणि प्रवाशांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी जाप्रâाबाद ते जालना शहराला जोडणारी जाफराबाद आगाराची बस सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. यांची गांभीर्याने घेऊन आमची मागणी मान्य करत तात्काळ जाफराबाद ते जालना बस सेवा सुरू करावी. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे) स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी दिला आहे.

००००००फोटो ओळी…..१५- जालना येथील एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देतांना भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे.००००००००

संबंधित पोस्ट

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा गोदावरी अभ्यास गट 02 मांदांडे समितीच्या अहवालाच्या विरोधात जनजागृती अभियान – डॉ संजय लाखेपाटील