vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आजपासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना .

आजपासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना .

 

क्रिकेट प्रतिनिधी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील ऍशेस मालिकेतील (Ashes Series 2023) पहिला सामना 16 जून म्हणजे आज खेळवला जाणार आहे. 1882-83 मध्ये सुरू झालेली ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील ऍशेस मालिकेतील (Ashes Series 2023) पहिला सामना 16 जून म्हणजे आज खेळवला जाणार आहे. 1882-83 मध्ये सुरू झालेली ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे. 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल. इंग्लंडने नुकतीच आयर्लंडविरुद्धची एकमेव कसोटी 10 गडी राखून जिंकली, तर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करत आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 72 ऍशेस मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 34 वेळा विजय मिळवून आघाडी कायम राखली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने 32 वेळा मालिका जिंकली आहे. याशिवाय 6 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. याआधी 2021-22 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 ने विजय मिळवला होता. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 340 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 140 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 108 सामने जिंकले आहेत.

भारतात कधी आणि कुठे पाहणार सामना

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच या मालिकेचे लाइव्ह स्ट्रिमिंग ‘सोनी LIV’ अॅपवर केले जाईल, जिथे तुम्ही ते मोबाइलद्वारे थेट पाहू शकाल

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी टीम इंडियात समावेश

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

टीम इंडियाला चौथा धक्का, पंतपाठोपाठ सूर्याही परतला माघारी

vishwatmaklokswamivarta

दक्षिण आफ्रिकेवर ‘हे’ 3 भारतीय धुरंधर पडतील भारी, करतात ताबडतोड फलंदाजी

महिला आशिया चषक 2024: भारताचा नेपाळवर 82 धावांनी विजय…