vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार- मंत्री उदय सामंत

भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार- मंत्री उदय सामंत

 

राज्य प्रतिनिधी: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील प्रभारी सहायक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

 

सदस्य नीलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले, सोमनाथ सोष्टे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र.५ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असताना नाले व गटार सफाई करण्याकरिता मजुरांचे वेतन देण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अग्रिमाचा ताळमेळ सादर केलेला नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेमार्फत दिलेल्या नोटिसीचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या मासिक वेतनातून दरमहा रक्कम कपात करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशास अनुसरून कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी सदस्य रईस शेख, प्रशांत बंब, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले.

 

000

 

श्री. दीपक चव्हाण/विसंअ/

संबंधित पोस्ट

बालकांशी निगडीत सामाजिक समस्या निराकरणासाठीकालबद्ध कार्यक्रम राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलचं नाव सातत्याने चर्चेत  . आता तिने ‘पाटील’ आडनाव लावू नये, असा इशारा.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मराठवाडा विभागातील दलित आदीवासी भूमिहिन कास्तपट्टे नावेकरुन सातबारा उतार्‍याला नोंद घ्या – महसुलमंत्र्याकडे शिवसेना दलितआघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांची निवेदनाव्दारे मागणी..

मुंबईत गडगडाटासह जोरदार पाऊस, सायन-कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल बंद….

एमआयडीसीतील विकास कामांचा डिपीआर तयार करावा – पालकमंत्री पंकजा मुंडे  

vishwatmaklokswamivarta