vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलचं नाव सातत्याने चर्चेत  . आता तिने ‘पाटील’ आडनाव लावू नये, असा इशारा.

महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलचं नाव सातत्याने चर्चेत  . आता तिने ‘पाटील’ आडनाव लावू नये, असा इशारा.

पुणे प्रतिनिधी

गौतमीचं खरं आडनाव ‘पाटील’ नसून ‘चाबुकस्वार’ असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पाटील हे आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय, असा तिच्यावर आरोप आहे.तिने पाटील आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी दिला.

महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलचं नाव सातत्याने चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होते. त्यामुळे तिच्यावर टीका केली जाते. आता तिने ‘पाटील’ आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. शिवाय त्यासंबंधीची एक बैठक पुण्यात झाली होती. गौतमीचं खरं आडनाव ‘पाटील’ नसून ‘चाबुकस्वार’ असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पाटील हे आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय, असा तिच्यावर आरोप आहे.

तिने पाटील आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी दिला. एकीकडे पुण्यात मराठा महासंघाने गौतमीला पाटील आडनाव लावण्यास विरोध केला. तर दुसरीकडे मात्र जळगावतील मराठा महासंघाने गौतमी पाटीलला पाठिंबा दिला आहे.

पाटील हे आडनाव कुणाची मक्तेदारी नाही. पाटील हे आडनाव कोणतीही जात दर्शवत नाही. हे आडनाव म्हणजे एक उपाधी आहे. ज्यांच्याकडे पाटीलकी असायची ते पाटील आडनाव लावायचे. अगदी ब्राह्मणांमध्येही पाटील आडनाव आहे. त्यामुळे पाटील आडनावावर कुणाची मक्तेदारी नाही. गौतमी पाटीलला आडनाव वापरण्यापासून कोणीही रोखू नये, असं मराठा महासंघाने म्हटलं आहे.

मराठा सेवा संघाचे नेते सुरेंद्र पाटील यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटीलचं आडनाव पाटील आहे, म्हणून मराठा समाजाची बदनामी होत आहे असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. वैयक्तिकरित्या ते मला पटत नाही. सामाजिकरित्या पाटील हे आडनाव हे मराठा समाजाचं आहे, असं मला वाटत नाही. कारण मी स्वत: पाटील आहे. पण आमचं मूळ आडनाव जाधव आहे. पण आमच्या घरात पाटीलकी असल्याने आमच्या घरच्यांनी पाटील आडनाव लावलं आहे, असं सुरेंद्र पाटील म्हणाले आहेत

संबंधित पोस्ट

संविधान दिनानिमित्त “घर घर संविधान” दिंडीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वाई विधानसभा मतदार संघाची निवडणुकीसाठी तयारी पूर्ण*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिले एका आठ वर्षीय बालिकेला नवजीवन…

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta

कोलपल्ली नाल्याच्या पुरात अडकलेले ग्रामसेवक उमेश धोडरे यांना जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने वाचवले*

vishwatmaklokswamivarta

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

vishwatmaklokswamivarta