vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

 सांगली, प्रतिनिधी) : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शोभेची दारू बनविताना झालेल्या स्फोटातील जखमींच्या पाठिशी शासन व प्रशासन आहे. त्यांच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, असा दिलासा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रूग्णांच्या नातेवाईकांना दिला.

 कवठेएकंद येथील घटनेतील काही जखमींना मिरज येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, समित कदम, रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय साळुंखे, डॉ. राजकुमार खंबे आदि उपस्थित होते.

 दसऱ्याच्या रात्री श्री बिऱ्हाडसिध्‍द देवाच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या आतषबाजीसाठी शोभेची दारू तयार करत असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटात जखमींपैकी गजानन यादव, विवेक पाटील, आनंद यादव, आशुतोष पाटील या रूग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी या जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या.

उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर 25 लाख रूपयांतून रूग्णालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार देयके अदा करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सदर व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संबंधितांनी अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच पूर्वपरवानगी घ्यावी, असे ते म्हणाले.

00000

संबंधित पोस्ट

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

शिर्डीचे साईबाबा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवालसिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत