vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ६३.०७ टक्के मतदान ..

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ६३.०७ टक्के मतदान ..

 

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एकूण २० लाख ५९ हजार ७१० मतदारांपैकी १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदार संख्येच्या ६३.०७ टक्के मतदान झाले आहे,अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.

 

जिल्ह्यात एकूण २० लाख ५९ हजार ७१० मतदार आहेत. त्यात १० लाख ७७ हजार ८०९ पुरुष तर ९ लाख ८१ हजार ७७३ महिला व १२८ इतर मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख ९ हजार ८१६ पुरुषांनी तर ५ लाख ८९ हजार १८४ महिला व ४० इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

१९ औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान या प्रमाणे-

 

१०५ कन्नड-३ लाख २५ हजार ०७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (६६.७८%)

 

१०७ औरंगाबाद (मध्य)-३ लाख ५० हजार १५१ पैकी २ लाख ११ हजार ५००(६०.४०%),

 

१०८ औरंगाबाद (पश्चिम)-३ लाख ८९ हजार २३५ पैकी २ लाख ३५ हजार ७८४(६०.५८%),

 

१०९ औरंगाबाद (पूर्व)- ३ लाख ३८ हजार ११३ पैकी २ लाख ६ हजार ६३३(६१.११%),

 

१११ गंगापूर- ३ लाख ४७ हजार १२२ पैकी २ लाख २७ हजार १५२(६५.४४%),

 

११२ वैजापूर- ३ लाख १० हजार १७ पैकी २ लाख ८८२ (६४.८०%) मतदारांनी आपला हक्क बजावला.

 

एकूण ६३.०७ % मतदान नोंदविण्यात आले.

 

०००००

संबंधित पोस्ट

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते श्री. ऋषिकेशदादा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील खरोळा गावामध्ये दौऱ्याची होतेय सर्वत्र चर्चा..

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल

सोयाबीनच्या गंजीला खोडसाळपणाने आग लावल्याने तीन लाखाचे नुकसान* सोमनाथ जळगाव येथील घटना; गुन्हा दाखल 

अर्जुनराव खोतकर यांचा ग्रामीण आणि शहरी भागात डोअर टू डोअर प्रचार-जालना विधानसभा मतदार संघास पुन्हा विकासाच्या उंचीवर नेणार-खोतकर

vishwatmaklokswamivarta

गुढी पाडवा-मतदान वाढवा मतदानाचा टक्का वाढवुन उभारु लोकशाहीची गुढी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचा निर्धार