
१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ६३.०७ टक्के मतदान ..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एकूण २० लाख ५९ हजार ७१० मतदारांपैकी १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदार संख्येच्या ६३.०७ टक्के मतदान झाले आहे,अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.
जिल्ह्यात एकूण २० लाख ५९ हजार ७१० मतदार आहेत. त्यात १० लाख ७७ हजार ८०९ पुरुष तर ९ लाख ८१ हजार ७७३ महिला व १२८ इतर मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख ९ हजार ८१६ पुरुषांनी तर ५ लाख ८९ हजार १८४ महिला व ४० इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
१९ औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान या प्रमाणे-
१०५ कन्नड-३ लाख २५ हजार ०७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (६६.७८%)
१०७ औरंगाबाद (मध्य)-३ लाख ५० हजार १५१ पैकी २ लाख ११ हजार ५००(६०.४०%),
१०८ औरंगाबाद (पश्चिम)-३ लाख ८९ हजार २३५ पैकी २ लाख ३५ हजार ७८४(६०.५८%),
१०९ औरंगाबाद (पूर्व)- ३ लाख ३८ हजार ११३ पैकी २ लाख ६ हजार ६३३(६१.११%),
१११ गंगापूर- ३ लाख ४७ हजार १२२ पैकी २ लाख २७ हजार १५२(६५.४४%),
११२ वैजापूर- ३ लाख १० हजार १७ पैकी २ लाख ८८२ (६४.८०%) मतदारांनी आपला हक्क बजावला.
एकूण ६३.०७ % मतदान नोंदविण्यात आले.
०००००



