vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सेवा सहकारी संस्थांना काम वाटप 24 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सेवा सहकारी संस्थांना काम वाटप 24 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी : सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी कंत्राटी शिपाई स्वरूपाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे आहे. हे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रासह दि. 24 जून 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

 

काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्याकडील एक कंत्राटी शिपाई स्वरूपाचे काम असून कामाचा कालावधी सहा महिन्याचा आहे तर मासिक मानधन अंदाजित 18 हजार रूपये आहे.

 

बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2022-23 चे लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशिल नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र सांगली आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, अजित पवार, पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला दिल्या खास शुभेच्छा!

बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट फसला, लॉरेन्स टोळीच्या 4 सदस्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक 

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात आज दुपारी चार वाजता एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री