vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

          जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.

 

संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 16 जुन 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दि. 30 मे 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*

संबंधित पोस्ट

मतदान करणारच… इतरांनाही सांगणार; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती*

जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीशकुमार यांची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड तर उद्या दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील.

vishwatmaklokswamivarta

कोषागार दिनी कुंडल वन प्रबोधिनीत वृक्षारोपण..

vishwatmaklokswamivarta

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उपयुक्त  –जिल्हाधिकारी किशन जावळे

काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना विधानपरिषद उमेदवारी..