vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन उत्साहात साजरा

सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन उत्साहात साजरा

 

 

रायगड (जिमाका)  :- सामाजिक न्यायाचे राज्य करणारे, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,रायगड कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय दिन सत्याग्रह महाविद्यालय खारघर येथे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग वंदना कोचूरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव, व प्रा.जी. के. डोंगरगांवकर यांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने दि.26 जून हा दिन आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यांचे ठराव मंजूर केला. त्या अनुषंगाने दरवर्षी 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा केला जातो.

 

श्रीम.कोचूरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 125 वर्षापूर्वी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे व शिष्यवृत्ती अशा योजना विद्यार्थ्यांसाठी चालू केल्या, त्यामुळे आत्ताही त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. तसेच सुनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबाबत माहिती देवून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

तसेच जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे ही सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग सुनिल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शाम कदम, प्राचार्या, जे.एस.एम. कॉलेज डॉ.सोनाली पाटील, प्रा.डॉ.पी.बी. आचार्य, कॉमर्स विभाग प्रमुख, जे.एस. एम. कॉलेज, अलिबाग तथा रायगड जिल्हा संघटक, नशा मुक्ती मंडळ हे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीम.माधुरी पाटील, कार्यालय अधिक्षक यांनी केले. सुनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन चरित्र व त्यांचे कार्याविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्याप्रमाणे आपणही त्यांचे कार्य पुढे चालु ठेवणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.रायगड शाम कदम तसेच प्रा.डॉ.पी.बी. आचार्य, कॉमर्स विभाग प्रमुख, जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग तथा रायगड जिल्हा संघटक, नशा मुक्ती मंडळ यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीपासुन परावृत्त होण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा.डॉ.पी.बी. आचार्य, कॉमर्स विभाग प्रमुख, जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग तथा रायगड जिल्हा संघटक, नशा मुक्ती मंडळ यांनी सर्वांना व्यसन मुक्तीची शपथ देउन कार्यक्रमाची सांगता केली.

 

तसेच सामाजिक न्याय दिनानिमित्त रायगड जिल्हयातील सर्व मुला/मुलींच्या वसतिगृहांत निबंध, वकृत्व, रांगोळी व चित्रकला अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

०००००००००

संबंधित पोस्ट

अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

आज (दि.२१)पासून दोन दिवस ग्रंथोत्सव; भरगच्च कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

सहकार विभागातील तक्रारींच्या निराकरणासाठी सहकार संवाद पोर्टल- जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू