vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये      — जिल्हाधिकारी किशन जावळे

आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये      — जिल्हाधिकारी किशन जावळे

 

 

 

रायगड(जिमाका) :- जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असून सद्यस्थितीत आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्तीची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करु नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी केले आहे.

 

महाडमधील पूर परिस्थितीची केली पाहणी

 

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड शहरासह तालुक्यातील पूर परिस्थितीची दुपारी पाहणी केली.

 

यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, तहसिलदार महेश शितोळे, मुख्याधिकारी कोळेकर यांच्यासह सर्व शासकीय विभागातील प्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी जावळे यांनी पूर परिस्थितीचा आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबतचा आढावा घेतल्यानंतर महाड शहरातील हुतात्मा अर्जुन भोई मार्गावरील पाण्यातून भोई घाटावर जाऊन एनडीआरएफच्या पथकाशी चर्चा केली. यानंतर दादली पुलावर जाऊन या ठिकाणच्या पाण्याची पाहणी केली.

 

महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्याच बरोबर महाबळेश्वर येथे सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड मधील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन श्री.जावळे यांनी यावेळी केले.

 

०००००००

संबंधित पोस्ट

दि.25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी पुर्ततेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta