vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोजागिरी पोर्णिमानिमित्तअंबड हद्दीतील वाहतुक मार्गात बदल..

कोजागिरी पोर्णिमानिमित्तअंबड हद्दीतील वाहतुक मार्गात बदल..

 

प्रदेश प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंबड येथे दि. 16 ऑक्टोबर, रोजी कोजागिरी पोर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने अंबड हद्दीतील मत्सोदरी देवी मंदीर येथे कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी दर्शनी यात्रा भरुन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदीरात दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमानासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

 

पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांना प्राप्त अधिकारान्वये त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये, जालनाकडे येणारी अवजड वाहनांना दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी 23.00 वाजता ते दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेशीत केले आहे.

 

यात बीडकडून अंबडमार्गे जालनाकडे येणारी अवजड वाहने ही (शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्रीसमोरील उड्डाणपुलाचे खालुन, पाचोड, अंबड, गोलापांगरीमार्गे जालनाकडे जातील.) तसेच जालनाकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

 

तसेच घनसावंगीकडुन अंबडमार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरीणी चौफूली घनसावंगी, गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, राणीउंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप समोरुन, गोलापांगरी मार्गे जालनाकडे जातील.) जालनाकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

 

तर घनसावंगीकडून अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपुरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्री, यामार्गे शहागडकडे जातील.) शहागडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

 

वरील मार्गाचे अवजड वाहतूकीमध्ये दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी 23.00 वाजता ते दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आला असून सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी असे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅनलला हरवलं, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी….

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुखांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर..

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या“डिजिटल व्हॅन” उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन संपन्न

जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची पुर्नगठीत करण्यासाठीइच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार- मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta