vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले “पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते” राज्यपाल-सी. पी. राधाकृष्णन

 जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले “पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते” राज्यपाल

सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय, शिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

प्रजासत्ताकदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा-2024-25

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय-बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल..

vishwatmaklokswamivarta

Sambhajiraje Chhatrapati: छत्रपती संभाजीराजे तीन मे नंतर काय भूमिका घेणार? ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

धारावीतील संत रोहिदास समाज बांधवांसह भगिनींचा होलिकोत्सव संपन्न..

vishwatmaklokswamivarta

पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*