vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१०८- औरंगाबाद (पश्चिम) स्वीप उपक्रम’मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

१०८- औरंगाबाद (पश्चिम) स्वीप उपक्रम’मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

 

राज्य प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, – १०८-औरंगाबाद (पश्चिम) मध्ये आज मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले.

१०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी आज सकाळी ८ वा. क्रांती चौकातून मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दौडची सुरुवात करण्यात आली.

   उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, उपायुक्त मनपा अंकुश पांढरे, उपसंचालक आपत्ती व्यवस्थापन स्वप्नील सरदार, सहसंचालक तंत्रशिक्षण अक्षय जोशी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व गटशिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी दीपाली थावरे यांची यावेळी उपस्थिती होती.

सहभागी धावपटूं व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व सर्व उपस्थित मान्यवरांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन धावण्यास सुरवात केली. ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अभिमान’, ‘आपले अमूल्य मत-करेल लोकशाही मजबूत’ अशा घोषणा देत मतदान जनजागृती करत मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅली मध्ये एमआयटी, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक महाविद्यालय,छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय इ.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आयोजनासाठी देवगिरी महाविद्यालयातील एनसीसी व रासेयो विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक नोडल अधिकारी मनोज बिरुडे, गोविंद उगले, साहेबराव धनराज,अनंत कणगारे,परसराम बाचेवाड, तुकाराम वांढरे आदींनी परिश्रम घेतले. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात या दौडचा समारोप झाला

संबंधित पोस्ट

आमचा एकही आमदार नाराज नाही, उलट राष्ट्रवादीची मंडळी शिंदे गटाच्या संपर्कात; उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई चा गौप्यस्फोट

vishwatmaklokswamivarta

संजय राऊतांना जामीन मिळणार? पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज कोर्टात सुनावणी

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

vishwatmaklokswamivarta

5 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदान येथे महायुतीचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा आज मुख्यमंत्री पदाचा नेता निवड…

vishwatmaklokswamivarta

संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावे- जिल्हाधिकारी स्वामी