vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला आला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात

 

राज्य प्रतिनिधी- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप  त्याला अटक का केली जात नाही? त्यातच स्वतः वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. या वेळेला त्याचा ताबा बीड पोलिसांनी घेतला आहे

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे. त्याला अटक का केली जात नसल्याचा आरोप केला जात असताना अचानकपणे उज्जैन वरून येऊन स्वतः वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,

बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकी कराडने एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला आहे. या हत्येप्रकरणात ज्यांचा संबंध असेल त्यांना फाशीची द्यावी, माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही. खंडणी प्रकरणी मी पोलिसांना शरण जात आहे. शिवाय न्याय देवता देईल ती शिक्षा मला मान्य असेल, असं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरूवातीपासून वाल्मिक कराड हे नाव मुख्य आरोपी आहे. कराडवर खंडणीचे अनेक आरोप असून देशमुख यांचे मारेकरी कराड याच्याशी संबंधित असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

अखेर 22 दिवसांनंतर कराड स्वत: पोलिसांना  शरण आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला वेग आल्याचा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आरोपी स्वत: शरण आला तर पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली? असा सवाल आता देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिसांकडून आरोपी वाल्मीक कराड याला बीड पोलिसांना ताबा देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पुढील तपास सीआयडी आणि बीड पोलीस आणि स्पेशल विभाग करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे

संबंधित पोस्ट

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवरखर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तरआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची उपस्थिती,दिप ज्योत हातमाग खादी उद्योगाची भरारी!

राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना-केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन**मुला मुलींच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या**- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन* 

vishwatmaklokswamivarta

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके