vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहिल्यानगर, प्रतिनिधी उजनी धरणात आज सकाळी १० वाजता ९३.८७ टक्के पाणीसाठा झाल्याने पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी केले आहे. पुणे जिल्हा व घाटमाथा परिसरासाठी भारतीय हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. दौंड येथील सरिता मापन केंद्रावर सध्या ७०,०८९ क्यूसेक्स पाण्याची आवक असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी ११ वाजता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत ५,००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच जलविद्युत केंद्रातून १,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. पावसाचे प्रमाण व धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी विनंती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

शिवसेनेचा झंझावात जिल्ह्यात निर्माण करा- शिवसेना नेते अंबादास दानवे- गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक मोहीम- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामालालागावे- जिल्हाप्रमुख महेश नळगे- महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; आज 31 डिसेंबरला मद्य विक्री वेळेत शिथिलता अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन…

vishwatmaklokswamivarta

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

vishwatmaklokswamivarta

राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखांहून अधिक नागरिकांशी जनसंवाद

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार- कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta