vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात…

राज्य प्रतिनिधी जालना,) :- जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने रस्ता सुरक्षाविषयक बॅनरद्वारे जनजागृती करणे, शाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयक व्याख्यान आयोजित करणे, रस्त्यावरील बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहनांना परावर्तिका (रिफलेक्टर) लावणे, वाहन चालकांची आरोग्य तपासणी करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूल कार्यशाळा आयोजित करणे तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत बाबींची तपासणी करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे· मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा १० वरुन १५ लाख रुपये…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थितीयुवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल- मुख्यमंत्री