vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित

निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित

राज्य प्रतिनिधी 📍पुणे

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील #निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

#महात्मागांधी यांनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत असलेले प्रशिक्षण अत्यंत प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन यांनी केले.

आपण अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र, अन्नाची गुणवत्ता, विषयुक्त अन्नामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांसह अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. निसर्गोपचार, आयुर्वेद, योग, युनानी, आधुनिक उपचारपद्धतींमध्ये आपला समृद्ध वारसा आहे. निरोगी भारतासाठी #निसर्गोपचार महत्वाचे आहेत. समग्र उपचार पद्धती आज महत्वाची असून निसर्ग हाच आजारांवरील महान उपचारक आहे, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यावेळी म्हणाले.

देशाला आत्मनिर्भर बनविण्यात स्वदेशी उपचारपद्धती महत्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०१४ नंतर महात्मा गांधीजींच्या या आश्रमासारख्या प्रयोगांचा विस्तार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. केंद्राने #आयुष मंत्रालयाची स्थापना केली असल्याचे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह म्हणाले.

निसर्गोपचार आश्रम केवळ एक आरोग्य केंद्र नसून जीवन जगण्याचा महत्वपूर्ण मार्ग आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेला हा आश्रम नैसर्गिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून आरोग्य, स्वावलंबन आणि साधेपणाच्या जीवनाचा संदेश देतो. केवळ आजारांवरील उपचार नव्हे तर सुदृढ जीवनशैली आणि निसर्गासोबत संतुलन राखण्याची प्रेरणा देखील निसर्गोपचार आश्रम देत आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा संपन्न

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

मुंबईतील विलेपार्ले भागात स्थित साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या की, घातपात? कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार