vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

 

-: सांगली प्रतिनिधी : महिला व बालकल्याण विभागाच्या अन्वये राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून आपल्या तक्रारी महिला आयोगाकडे पाठवाव्यात, अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी दिल्या.

      सामाजिक न्याय भवन सांगली येथे श्रीमती नंदिनी आवडे यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय गिड्डे, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती मीनल कोळेकर, सहाय्यक संचालक श्रीमती भांबुरे, संशोधन अधिकारी मेघराज भाते उपस्थित होते.   या कार्यक्रमादरम्यान गोकुळ नगर, सांगली येथील संग्राम संघटनेच्या महिलांनी श्रीमती आवडे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक उपआयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या“डिजिटल व्हॅन” उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन संपन्न

नवी मुंबईतील पारसिक हिल, बेलापूर येथील धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta