vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

 

सांगली प्रतिनिधी : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली पाणी मागणी क्षेत्रीय अधिका-यांकडे द्यावी. ज्या क्षेत्रातील शेतकरी वेळेत पाणीपट्टी भरतील त्यांच्याकरीताच शाखा कालवा, वितरीका, लघुवितरीका यावरील गेट मधून प्राधान्याने पाणी सोडण्यात येईल याची नोंद घ्यावी. तरी रब्बी आवर्तनासाठी पाणी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. रा. कोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सन 2024-2025 मधील रब्बी आवर्तन दिनांक १० जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वेळेत पाणीपट्टीचा भरणा केल्यास नियमितपणाने सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच सद्यस्थितीत विद्युत देयकामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. तरी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सिंचनाची रब्बी हंगामाची प्रस्तावित पाणीपट्टी प्रती द.ल.घ.फु. रु.23,839/- इतकी असून ती वेळेत भरुन सहकार्य करावे. दिनांक 10 जानेवारी पासून लाभक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये पाणी मागणी नमुना (7) भरुन घेण्याकरीता नियोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta