vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा

सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा

 

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व पार्टनर NGO YRG Care तसेच सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 जानेवारी 2025 रोजी सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, ठाणे या विभागाने महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित व सकारात्मक जीवनशैलीविषयी माहिती देणे होता.

या कार्यक्रमात एचआयव्ही/एड्सविषयी तज्ज्ञांनी युवकांसमोर एड्सचा धोका, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, तसेच उपचारांच्या उपलब्ध सोयी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मोफत एचआयव्ही तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले. युवकांना सुरक्षित लैंगिक व्यवहार, आरोग्यविषयक स्वच्छता, आणि समुपदेशनाच्या महत्त्वाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून प्रदर्शन व माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. एचआयव्ही/एड्सविषयक माहिती समजावून सांगण्यासाठी पोस्टर प्रदर्शन आणि माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून सहाय्यक संचालक बेसिक सर्विसेस व प्रिवेंशन विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे डॉ.राहुल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, म.रा.ए.नि. संस्थेचे युवा समन्वय श्री.अनुराग कुलकर्णी, ज्ञान साधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश भगूरे, कुटुंब कल्याण व प्रशिक्षण केंद्र, ठाणेच्या प्राचार्या डॉ.शुमा राठोड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.रतन गाढवे, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हापर्यवेक्षक श्री.अशोक देशमुख, श्रीमती नीलिमा पाटील, CSO ठाणेच्या श्रीमती प्रफुलता चुरी, YRG संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही/एड्सविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला आहे. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने युवकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी समाजासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच नर्सिंग प्रशिक्षण केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय व ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केल.

00000000

संबंधित पोस्ट

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..!

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण..

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

vishwatmaklokswamivarta