vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी अज्ञात चोरट्याकडून चाकू हल्ला-लीलावती रुग्णालयात दाखल, पोलीस आरोपी चा शोध घेत आहे

 बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी अज्ञात चोरट्याकडून चाकू हल्ला-लीलावती रुग्णालयात दाखल, पोलीस आरोपी चा शोध घेत आहे

[ मुंबई प्रतिनिधी]

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या मुंबईत राहत्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ जखमी झाला असून लिलावती रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, डिलेव्हरी बॉयचे कपडे घालून आलेल्या चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला.

विश्वासनीय सूत्रांकडून माहिती

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. घरात चोर शिरल्याचं समजल्यानंतर सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड ऐकून बाहेर नेमका काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी झोपेतून जागा झालेला सैफ अली खान बेडरुममधून बाहेर आला. सैफ जसा त्याच्या बेडरुममधून बाहेर आला तसा त्याच्या समोर हा चोर उभा असल्याचं दिसलं. एकीकडे चोर घरात शिरल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरु असतानाच सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी सैफला काही समजण्याच्या आधीच चोराने सैफ आपल्याला पकडेल या भीतने त्याच्याकडील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरचाकर तातडीने त्याच्या मदतीला धावले. त्यांनी सैफला लिलावती रुग्णालयात दाखल केलं. सर्वजण जखमी झालेल्या सैफच्या मदतीला धावल्याने या संधीचा फायदा घेत चोराने पळ काढला. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.पुढे

सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार- अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास हाती घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर नेमका कोण होता? घटना घडली तेव्हा घरात कोण कोण होतं? नक्की काय घडलं आणि इतरही प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफवर हल्ला करणाऱ्या चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे

संबंधित पोस्ट

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण..वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी…

देशाला ‘संपन्न ऊर्जा’ राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार*२५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती**एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी*

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूरची तालुकास्तरीय पडताळणीसुशासन, हरित गाव व नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीकडून पाहणी; कामकाजाबाबत समाधान व्यक्त