vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांच्या वापरामुळे शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने जमिन सुधारणा उपाययोजना राबवाव्या व सेंद्रिय शेतीला चालना देणारे उपक्रम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हास्तरीय समितीमार्फत घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मधुरिमा जाधव, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे, सहा. प्रकल्प संचालक आत्मा डॉ. ए.के. वाडिले, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या. जेणेकरुन लोकांना विषमुक्त अन्न पिकवून देता येईल.

त्यासाठी सेंद्रीय शेतीला चालना द्यावी. यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वसुंधरा पाणलोट विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांना आपत्ती प्रसंगी मदत देण्याच्या योजनांबाबत इ- ऑफिस प्रणालीचा अवलंब करावा. मदत देण्यातली विलंबितता दूर करावी. तसेच महिला बचत गटांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ देण्यात यावा,असेही निर्देश दिले. 00000

संबंधित पोस्ट

छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य-देण्यासाठी 30 जून पर्यंत दरपत्रक मागणी

64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळण्याबाबतच्या शासनाने जारी केल्या सूचना…

शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ