vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड वसूली व 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड वसूली व 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याप्रमाणेच एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येत असून प्रतिबंधीत प्लास्टिक जप्त करण्यासोबतच दंडात्मक वसूलीही करण्यात येत आहे.
याकरिता स्थापित भरारी पथकांमार्फत तपासणी कार्यवाही करण्यात येत असते. आज परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. संजय तायडे यांच्या माध्यमातून घणसोली विभागातील दुकानांमध्ये अचानक जाउुन प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली. यामध्ये रॉयल फरसाण घणसोली, दिनेश फरसाण घणसोली व शिवशक्ती मार्ट घणसोली या तीन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्या कडून प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे एकूण 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्यासोबतच 30 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.
   प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला व पर्यावरणाला मोठया प्रमाणावर हानी पोहचत असून नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातून एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करावे. त्याकरिता कापडी पिशव्यांचा पर्याय स्विकारावा असे आवाहन करित व्यावसायिकांनीही प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिक दुकाने / कार्यालये याठिकाणी ठेवू नये असे सूचित करण्यात येत आहे.000000

संबंधित पोस्ट

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा…

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत