vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिलारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान-दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिलारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान…

नवी दिल्ली प्रतिनिधी

राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा  गौरव करण्यात आला.

यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी शूटर मनु भाकर, बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान-राष्ट्रीय खेळ पुरस्कारांत महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या स्वप्निलने नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्याचबरोबर स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी यालाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 40 वर्षांनी शॉटपुट प्रकारात पदक जिंकणारा सचिन हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच, महाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मार्केट यार्ड येथे अनावरण

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta