vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई 

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई

 

         नवी मुंबई प्रतिनिधी स्वच्छ व सुंदर शहराचा नवी मुंबईचा लौकिक वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासोबतच सार्वजनिक भागात अनधिकृतपणे टाकण्यात येणारा राडारोडा व पाडकाम साहित्याचे डेब्रिज टाकले जाऊ नये याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याकरिता दोन्ही परिमंडळनिहाय भरारी पथके कार्यान्वित असून त्यांच्यामार्फत डेब्रिजविरोधी कार्यवाही सुरु असते.

अशाच प्रकारे घणसोली महिला सक्षमीकरण केंद्राजवळ डेब्रिज टाकले जात असल्याची तक्रार महानगरपालिकेस व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या निर्देशानुसार त्वरित कार्यवाही करीत दोन डंपर वाहने जप्त केली आहेत. या वाहन मालकांकडून प्रत्येकी रु. 30 हजार याप्रमाणे एकूण रु. 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यास येत आहे.

नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे याकरिता नागरिकांचे सक्रिय योगदान अपेक्षित असून नागरिकांनी बांधकाम सुरु असल्यास आपले पाडकाम साहित्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी असलेल्या सी ॲन्ड डी वेस्ट प्रकल्पाठिकाणी दयावे असे आवाहन नागरिकांना करतानाच डेब्रिजव्दारे शहर विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांच्या विरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत

आहे00000

संबंधित पोस्ट

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे *भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक

vishwatmaklokswamivarta

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

वनवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा*- *वनमंत्री गणेश नाईक*

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.