vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन झेंडा ग्रुप धारावी आणि विभागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विठ्ठल भक्तांनी विठू रायाच्या नाम घोषात दिंडी पदयात्रा काढून भक्तांना फराळ वाटून संपन्न झाली

झेंडा ग्रुप ऑफ धारावी यांच्या वतीने रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावरील नवीन चाळ लक्ष्मी मंदिर येथून पेरियर स्वामी चौक कामराज स्कूल 90 फूट रोड संसार हॉटेल खंबा देव रोड विठ्ठल मंदिर आणि धारावी काळा किल्ला संत रोहिदास मंडळ विठ्ठल मंदिर या परिसरात विठू नामाचा गजर करत पायी दिंडी व सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन एकात्मतेचे भावनेने सर्व धर्म समभाव जपत सकाळी साडेदहा ते दीड या वेळात दिंडी पूर्ण केली यावेळी धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांनी या दिंडीतील वारकऱ्यांना संसार हॉटेल नाक्यासमोर शुभेच्छा दिल्या तसेच खंबा देव विठ्ठल मंदिर व काळा किल्ला येथील मंदिरात मुक्तपणे दर्शन घेतले त्यावेळी श्री गणेश खाडे व सुनील खाडे यांनीही वारकऱ्यांचे कौतुक करून आभार मानले, कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या सर्व भाविकांना लक्ष्मी मंदिर नवी चाळ येथे झेंडा ग्रुपच्या वतीने उपवासाचा फरक वाटप करण्यात आला

या सामाजिक संदेश देणाऱ्या पायी दिंडी मध्ये धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत यांच्याही सदस्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती श्री विष्णू कटके व दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

vishwatmaklokswamivarta

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta

प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या    पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुका, ओला रंग लावू नका