vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुणे येथील राजगुरुनगर मधील पीडित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 पुणे येथील*राजगुरुनगर मधील पीडित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 

मुंबई प्रतिनिधी – पुणे येथील राजगुरुनगर मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलींवर नराधमाने अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. अत्याचारात बळी गेलेल्या मुली या सख्ख्या बहिणी होत्या.पीडित मुलींच्या शोकाकुल कुटुंबीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी पीडित मुलींच्या आई वडिलांना धीर दीला.राज्य सरकार तर्फे सांत्वनपर 10 लाखांचा निधी जाहीर झाला असून तो पीडित कुटुंबीयांना त्वरित मिळवून देण्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.रिपब्लिकन पक्षा तर्फे सांत्वनपर निधी देण्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

8 आणि 9 वर्षांच्या अजाण मुलींवर अत्याचार करणाऱ्या निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे. नराधम आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक करून पोलिसांनी चांगली कामगिरी केली.

 यावेळी भटक्या विमुक्त समाजाच्या शिष्टमंडळाने ना.रामदास आठवले यांची भेट घेऊन भटक्या विमुक्त समाजाला सुद्धा एट्रोसिटी ॲक्ट चे संरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने पी 8-आय विमानातून स्वदेशी ‘एडीसी-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या घेतल्या यशस्वी चाचण्या

बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश बेस्ट सक्षमीकरण आणि कर्मचारी मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय,बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ संप मागे घेत असल्याचे कृती समितीने केले जाहीर..

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

रेल्वेच्या मालवाहतुकीत नवा इतिहास! इगतपुरी मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगला प्रारंभ; मध्य रेल्वेची मोठी भरारी …