vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली..

 

राज्य प्रतिनिधी-ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं ‘गांधी आणि संविधान’ पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

संबंधित पोस्ट

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे• बार्बाडोस येथील ६८ व्या सी.पी.ए. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात भारतातील राज्य विधानमंडळ पीठासीन अधिकारी यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta