vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, द प्रतिनिधी : ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार सुरेश म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसचिव प्रशांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मंत्री श्री.गोरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा, उपस्थिती व शैक्षणिक शिस्त यामध्ये सकारात्मक बदल होईल. सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियोजन करण्यात यावे. ठाणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले.तसेच, जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनातील विभागीय चौकशा वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शाळांचे दुरुस्ती कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि आवास योजना या बाबींमध्ये ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम होत असून, येत्या काळात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

0000000

 

किरण वाघ/विसंअ/

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाखशेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चात २१ जुलै समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मिलिंद बोर्ड यांचे आवाहन

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल