जमिन मुल्यांकन विषय चिघळण्याच्या मार्गावर आजुनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाल 4 तारखेची डेडलाईन-दिलीप राठी* 5 तारखेला शेकडो शेतकरी आत्मदहन करणार* जिल्हाधिकारी, एसडीएम यांच्या एसीबी चौकशीवर ठाम
(सिडकोत 900 कोटींचा घोटाळा-संतोष सांबरे,नांदेड-समृध्दी महामार्ग असेल कवा सिडकोचा प्रकल्पा या माध्यमातुन शासकीय-प्रशासकीय मंडळीच्या माध्यमातुन दलाल केवळ मलिदा लाटण्याचे काम करीत असल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला आहे. सिडको प्रकल्प हे त्याचे उदाहरण असून, त्यात 900 कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याबाबत लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली
चुकीचे मुल्यांकन गंभीर प्रकार-विष्णु पाचफुले
नांदेड-जालना समृध्दी महामार्गाचे प्रशासकीय मंडळीने केलेले मुल्यांकन हे अत्यंत अल्प असून, या गंभीर प्रकारासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी केली आहे. सिडको प्रकल्पातही अशाच अनेक गंभीर चुका घडल्या असून, त्याचे आपण स्वत:देखील बळी पडलो असल्याचेही ते यावेळी म्हणाले
..अन् श्रीमंत हरकळ यांनी घेतली आंदोलकांची भेट
देवमुर्ती येथे नांदेड-जालना समृध्दी महार्गाच्या चुकीच्या मुल्यांकनाविरेोधात सुरु असलेल्या आंदोलनाला आज शुक्रवारी (ता. 31) सायंकाळी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांनी भेट देवून आंदोलनाचे प्रमुख दिलीप राठी यांच्यासोबत चर्चा केली. तसेच मुल्यांकन आणि शेतकऱ्यांच्या मागण्या या विषयी माहिती जाणुन घेत त्याची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे सांगत ज्याकाही त्रुटी राहिल्या असतील त्या दुर करण्याचा पुरेपुर प्रयत्न करुत. मात्र, दिलीप राठी आणि शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंतीदेखील त्यांनी यावेळी केली.
जालना/प्रतिनिधी – नांदेड-जालना समृध्दी महामार्गात बाधीत होणाऱ्या जमिनीची मुल्यांकन करतांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुजाभाव केला असून, त्याविरोधात आत्मदहनाचा ईशारा दिलेला असलातरी आजुनही वेळ निघुन गेलेली नसून, येत्या 4 तारखेपर्यंत हे आंदोलन शांततेतच सुरु राहणार असल्याचे बजावत त्यानंतर मात्र वादळ निर्माण झाल्यास त्याचे परिणामही प्रशासनाला भोगावे लागतील, असा ईशारा आंदोलनाचे प्रमुख दिलीप राठी यांनी आज शुक्रवारी (ता. 31) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला
देवमुर्ती येथील वृंदावन गोशाळेच्या पायथ्याशी जमिन मुल्यांनाच्या विरोधात गत 4 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी श्री. राठी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिडको प्रकल्पातील जमिन बाधीत सामधान शेजुळ, माजी आमदार संतोष सांबरे, माजी पंचायत समिती सदस्य कैलास उबाळे, सुरेश कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. राठी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी 10 दिवसांपुर्वी आपण आणि शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा ईशारा दिलेला असतांनाही आजपर्यंत प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नसून, या आंदोलनात प्रशासनाच्या जाचाला कंटाळलेला शेतकरी सहभागी झाला आहे. वास्तविक हे आंदोलन तीव्र बनविण्याची आमची क्षमता आहे. मात्र, सामान्यांना आम्हाला वेठीस धरायचे नसून, त्यामुळेच आम्ही संयम धरुन आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींना प्रत्यक्षात 1 ते दीड कोटीचे बाजारमुल्य आहेत त्यांचे 20-25 लाख मुल्यांकन काढणे हे योग्य नसून, त्यास सर्वस्वी निश्चित करण्यात आलेली जिल्हाधिकारी यांची समितीच जबाबदार आहे. शिवाय संपादीत जमिनीचा ड्रोनने सर्व्हे करण्याचा प्रताप करण्यात आला असल्याने त्यात प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती लक्षात येत नाही. अर्थात जमिनीवरील पाईप लाईन, विहीर आणि फळबागांची नोंद योग्यप्रकारे घेण्यात आलेली नसल्याचे सांगत आम्हाला जास्त नको तर रास्त भाव मिळणे आपेक्षीत असल्याचे श्री. राठी म्हणाले.
या ठिकाणी आपली गोशाळा असून, त्यात 400 गायींचा आपण स्वखर्चाने सांभाळ करतो. मात्र, समृध्दी महामार्गात जमिन जात असल्याने आणि त्यात नगण्य मुल्यांकन निघल्याने उध्दवस्त होण्याची आपल्यावर आली असून, असेच इतरही अनेक शेतकऱ्यांसोबत घडलेले आहे. त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेने आमच्याकडे यावे, आमच्याशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा, अशी आपली मागणी आहे. यापुर्वी अनेकदा प्रशासनाला निवेदने देण्यात आली आणि भिक मांगो आंदोलनही केले. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम झालेला नसल्याने आता हे ठिय्या आंदोलन करुन आत्मदहन करण्याची वेळ आपल्यावर ओढावली आहे. असे असतांनाही त्याचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात येत नसून, आम्ही जिव द्यायचे नाटक करतोय, असे तर प्रशासनाला वाटत नाही ना? अशी विचारणाही श्री. राठी यांनी केली. प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईच्या कारभारामुळेच शेतकरी भराडला जात असून, त्यास पाठीशी घालण्याचे काम सरकारने करु नये. वास्तविक हे सरकारच शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत असून, व्यापाऱ्यांसाठी रेड कार्पेट टाकणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांची जाण नसणे हे क्लेशकारक असल्याचे श्री. राठी यांनी सांगितले.
या आंदोलनाला आ. अर्जुनराव खोतकर आणि माजी आमदार अरवदराव चव्हाण यांनी भेट दिली असलीतरी आंदोलनात कुठलेही राजकारण सामील नसून, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेवुन लवकरच प्रशासन जमाबंदीचा आदेश लागु करण्याची शक्यता आहे. मात्र, आम्ही आमच्या खाजगी जागेत आंदोलन करीत असल्याने त्या आदेशाचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे सांगतांनाच प्रशासनाला आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही, असेही श्री. राठी यांनी यावेळी बजावले.————