vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,कडक अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,कडक अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर, – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा होणार आहेत. या कालावधीत कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी प्रशासन सज्ज असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

यासंदर्भात झालेल्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होते.

    इयत्ता १० वीची परीक्षा दि.२१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान असून इयत्ता १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी तर इयत्ता १० वी ची परीक्षा ६८ हजार २२३ विद्यार्थी देत आहेत. त्यासाठी एकूण ३९९ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.   जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत की, कॉपीमुक्त अभियानासंदर्भात,अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची परीक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी करावी.परीक्षा केंद्र सर्व भौतिकसुविधा युक्त असावे,परीक्षा केंद्र जवळील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद असतील, पोलीस बंदोबस्त तपासणीसाठी असेल.संवेदनशील केंद्रात अधिक पोलीस बंदोबस्त राहील, तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुक्याचे विविध विभागातील अधिकारी यांची पथके करावीत व सर्व परीक्षा केंद्राना भेटी द्याव्यात,जिल्ह्यात कोणत्याही केंद्रात एकही कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक लक्ष ठेवा,रिपोर्ट करा,तात्काळ कृती करा, वैयक्तिक,सामुहिक कॉपी होणार नाही, झाल्यास कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात येईल,कॉपी झाल्यास वा केल्यास शाळांची मंडळ मान्यता व शाळा मान्यता कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल,परीक्षा नियंत्रण कक्ष व वॉर प्रत्येक परीक्षा केंद्राचे लाईव्ह नियंत्रण ठेवतील,असे निर्देश देण्यात आले आहे.

यासंदर्भात कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनीही आवाहन केले असून सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना आदेशीत केले आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाटकर यांनी केले

0000000

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे-परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी- पणन मंत्री जयकुमार रावल

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत ओला-उबर चालकांचे आंदोलन दोन दिवसीय आंदोलन

विशेष वृत्त :संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद· एम्बेड प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात लक्षणीय यश

vishwatmaklokswamivarta

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू 🗳️

दप्तर हलके करण्याच्या नावाखाली शिक्षण विभागाने केल्या कोटींच्या चुका !पुस्तकात वह्यांची पाने घालण्याच्या प्रयोगात शासनाचे१३५ कोटी वाया; सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी…