vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

          राज्य प्रतिनिधी  जालना :- मराठवाड्याच्या शहरासह ग्रामीण भागातून उत्तम खेळाडू घडून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करावे अशी माझी इच्छा आहे. तरी जिल्हा क्रीडा संकुलात उभारणी करण्यात येणारा स्विमींग पुल आकर्षक रचनेसह ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

    जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जून खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्मिता पवार, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढत आहे. विविध खेळामध्ये उदयोनमुख खेळाडू सराव करत आहेत. तसेच लगतच्या जिल्ह्यातील जलतरण स्पर्धेतील खेळाडूंना येथे संधी मिळेल असे पहावे. स्विमींग पुलाचे काम करत असतांना बालेवाडी येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत वापरण्यात आलेल्या स्विमींगपुलचे प्रथमत: अवलोकन करावे. स्नानगृहाचा परिसर स्वच्छतेसह कोरडा राहील याप्रकारे उभारणी करावी. तसेच क्रीडा संकुलाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येवून स्विमींग पुलासह इतर ठिकाणी वापरात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळावा. जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा-1 चे काम संपुर्ण करुन वापरात आल्यानंतर टप्पा -2 मधील 400 मीटर सिथेंटीक ट्रॅक, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान, धावपट्टी तसेच मल्टीपर्पज सभागृहाचे कामकाज हाती घेण्यात यावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी क्रीडा संकुलात करण्यात येणाऱ्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी1700 कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी देणार   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा वार्षिक योजना (2026-27) राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका

विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत मान्यता मिळालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..