vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य प्रतिनिधी: मुंबई महापालिकेने कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आधुनिक मुंबईचा शुभारंभ ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. शिदे बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई वेगाने कात टाकत आहे. विकसित होत आहे. आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. ग्लोबल मुंबईची चाहूल देणाऱ्या अर्थसंकल्पासाठी आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचं उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

भविष्यासाठी मुंबई वेगाने कात टाकतेय हे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पात ४३ हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहेत. त्यावरुन मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी असून येत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात सात हजार कोटींनी भर पडली आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

‘बेस्ट’ साठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतल्या पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल मुंबई ही देशाचं फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल त्याचाच हा शुभारंभ असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

धारावीतील संत रोहिदास समाज मंडळाचा होलिकोत्सव समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरा

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर–पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी

मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

कृत्रिम वाळू निर्मिती व वापराबाबत शासनाचे संपूर्ण सहकार्य तथापि, गुणवत्तेशी तडजोड नाही – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृत्रिम वाळू निर्मितीवर कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta