vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा उत्साहात संपन्न

 नव्या मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा उत्साहात संपन्न

         नवी मुंबई प्रतिनिधी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ चे टूलकिट नुकतेच केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे मंत्री ना.श्री.मनोहरलाल खट्टर यांनी प्रकाशित केले असून त्यानुसार स्वच्छताविषयक कामांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा स्वच्छता अधिकारी व कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा वाशी येथील महात्मा जोतिबा फुले भवनात उत्साहात संपन्न झाला.

   स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या देशातील मोठया शहरांची सुपर स्वच्छ लीग ही विशेष कॅटेगरी यावर्षी निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये नवी मुंबईसह इंदौर व सुरत अशा एकूण तीन शहरांचा समावेश आहे. अशा विशेष कॅटेगरीमध्ये आपल्या नवी मुंबई शहराचा समावेश असून ही सर्वांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी त्यामुळे आपले मानांकन टिकवून ठेवण्याची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले

   यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाप्रमाणेच सर्व विभागांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणा-या परीक्षकांच्या नजरेने आपल्या कामांची पाहणी करावी व एखाद्या ठिकाणी त्रुटी आढळल्यास त्या संबधितांच्या त्वरीत निर्देशनास आणून देउुन दुरुस्त करुन घ्याव्यात असेही त्यांनी निर्देशित केले.  स्वच्छता व सुशोभिकरण ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असून आवश्यकतेनुसार परस्परांशी समन्वय राखून तत्परतेने सुधारणा करुन घ्याव्यात असेही त्यांनी सूचित केले. निर्मितीच्या ठिकाणी नागरिकांच्या पातळीवर कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढवावे व नागरिकांपर्यंत स्वच्छता कार्याविषयी जास्तीत जास्त प्रमाणात माहिती पोहचवून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.      स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये स्वच्छ भारत मिशन मार्फत काही मानके बदलली असून परीक्षण व गुणांकनाच्या पध्दतीतही काही प्रमाणात बदल झालेला आहे. या टूलकिटची सविस्तर माहिती संबधित स्वच्छता अधिकारी व कर्मचा-यांना व्हावी व त्यानुसार स्वच्छता कार्याला अधिक सुनियोजितपणा यावा आणि गतीमानता प्राप्त व्हावी या करिता आजच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संतोष वारुळे यांनी सांगितले.   याप्रसंगी श्री. योगेश जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024 टूलकिटमधील गुणांकन पध्दती व त्यादृष्टीने अवलंबवयाची कार्यपध्दती याविषयी सादरीकरणाव्दारे बाबनिहाय सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुकत श्री. सुनिल पवार, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संतोष वारुळे, सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे, श्री. प्रबोधन मवाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतीश सनदी व इतर स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

  स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना निश्चय केला नंबर पहिला हे आपले ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येउुया आणि संकल्प पूर्ण करुया असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी केले.

000000000

संबंधित पोस्ट

मुंबई येथे 30 जून रोजी डाक अदालत

शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान…

vishwatmaklokswamivarta

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

देशाला ‘संपन्न ऊर्जा’ राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार*२५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती**एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी*

सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटनेत सुदृढ व आनंदी जगण्याची गुरुकिल्ली व्याख्यान संपन्न* 

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक