vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

 

राज्य प्रतिनिधी: आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विशेष पाहणी आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मंत्री अशोक उईके म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात सुधारणा आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. राज्यभरात एकूण 497 शासकीय आदिवासी आश्रमशाळा कार्यरत आहेत, जिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते, परंतु शाळांतील सोयीसुविधांबाबत अनेकदा तक्रारी येत असतात. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व विद्यार्थ्यांची अडचण समजून घेण्यासाठी, शाळेतील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांच्यातील संवाद आवश्यक आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शालेय जीवनातील विविध अडचणी जाणून घेतील. या अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहात अधिकारी व कर्मचारी मुक्कामी राहून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील. मुलींच्या आश्रमशाळेसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात य

: पाहणीत शाळेतील विविध सोयीसुविधांची तपासणी केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची माहिती, अन्नधान्याचा दर्जा, स्वयंपाकाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालयांची स्वच्छता, मुलींसाठी स्वतंत्र स्नानगृह व शौचालयांची व्यवस्था, आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सुनिश्चितता यावर विशेष लक्ष दिले जाईल.

शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासली जाईल, विशेषतः आर.ओ. फिल्टरची स्थिती, गरम पाणी आणि पाणी साठवणुकीची पद्धत यावर देखरेख केली जाईल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची देखील तपासणी केली जाईल, जसे की अन्नधान्याचा दर्जा, स्वच्छतेची पद्धत आणि जेवणाच्या गुणवत्तेची खात्री केली जाईल.

याशिवाय, शाळेतील इतर सुविधा जसे विद्यार्थ्यांना देण्यात येणारी गादी, बेडशीट, उशी आणि शाळेतील लाईट, पंखे, खिडक्या, विद्युत फिटींग्स, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रे इत्यादी यांची पाहणी केली जाईल.

तसेच, मुलींच्या वसतीगृहात असुरक्षिततेविषयी कोणत्याही तक्रारी तर नाहीत, याची काळजी घेतली जाईल. याशिवाय, मुलींच्या वसतीगृहात सॅनॅटरी नॅपकीन वेंडिंग मशीन, धोक्याची सूचना देणारी प्रणाली कार्यान्वित आहे का, याची देखील तपासणी केली जाईल.   अभियानाच्या दरम्यान अधिकाऱ्यांना काही मुद्द्यांवर स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यायचा असेल. हे अभिप्राय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता, टेट्रा पॅक दूध, निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वसतीगृह सुविधांची स्थिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची स्थिती, शिक्षकांचे अध्यापन कार्य आणि अभ्यासक्रम यावर आधारित असतील.अशा उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य शालेय वातावरण आणि सुविधांचा लाभ मिळेल. शाळेतील अडचणी आणि तक्रारी वेळेवर सोडवून त्यांचा शालेय अनुभव सुधारला जाईल. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्यामुळे त्यांच्या भावना आणि अडचणी अधिक प्रभावीपणे समजून घेतल्या जातील. हे अभियान आदिवासी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याशिवाय, या प्रकारच्या निरीक्षणामुळे शासनाला अधिक स्पष्ट माहिती मिळेल, ज्यामुळे आगामी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल.000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

२० हजार ७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण**समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीएहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता-  पंतप्रधान नरेंद्र मोदी*समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका नेटवर्क पूर्ण होणे ही ऐतिहासिक उपलब्धी* राज्यपाल जिष्णू देव वर्मा२०३० पर्यंत जेएनपीए हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले ठरणार पहिले बंदर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा एकतेचा संदेश • मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी • सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार 150 युनिटी मार्च’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पुनर्वसनाचे प्रस्ताव एकत्रित तातडीने सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta