vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ-उपमुख्यमंत्री अजित पवारसांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ-उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ-उपमुख्यमंत्री अजित पवार

        सांगली, प्रतिनिधी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू. निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, सुहास बाबर, रोहित आर. आर. पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष तर जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करिता नियोजन विभागामार्फत सांगली जिल्ह्यासाठी कमाल नियतव्यय 430 कोटी 97 लाख रूपये कळविण्यात आला होता. जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून 218 कोटी रूपये अतिरीक्त निधी मागणी करण्यात आली. यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.  जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरीक्त निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

 जिल्हा वार्षिक योजनेतून चालू आर्थिक वर्षात दिलेला निधी विहित वेळेत खर्च करावा, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल उपक्रमासाठी शासनाकडून निधी देऊ. त्याचबरोबर या उपक्रमासाठी लोकसहभाग व लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा. मॉडेल स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची सांगड घालण्यासाठी प्रशासन प्रमुखांनी नियोजन करावे. शासकीय इमारती व महापालिका क्षेत्रातील पथदिवे व पाणीयोजनांची विजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.       जिल्ह्यातील संरक्षित स्मारकांची यादी तयार करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करावा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्याचे आवाहन केले.

    जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरण केले. यामध्ये सांगली जिल्ह्याच्या नियमित व नाविन्यपूर्ण योजनांतर्गत मागील तीन वर्षातील मंजूर व पूर्ण झालेल्या उत्कृष्ट कामांचे सादरीकरण करण्यात आले. साकव बांधकाम तसेच, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून केलेल्या प्रयत्नांबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५५,२८६ लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर २८,७७६ लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा-केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते ॲानलाईन वितरित- पुण्यात गृहोत्सव कार्यक्रम संपन्न ; बुलढाण्यातून झेडपी सीईओ, सरपंच, लाभार्थी सहभागी

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण..

vishwatmaklokswamivarta

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta