vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटीबद्ध

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटीबद्ध

 

मुंबई, प्रतिनिधी- कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.

मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.

२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.000

संबंधित पोस्ट

महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती-जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

vishwatmaklokswamivarta

हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरण बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..