vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

राज्य प्रतिनिधी-बाबाआमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती तिरस्कार होत होता, अशा अतिशय कठीण काळात त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. या सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बाबा आमटे’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

#आनंदवन येथे महारोगी सेवा समितीच्या ७५ व्या वर्षपुर्तीनिमित्त उपस्थित राहता आले, हे मी माझे भाग्य समजतो. आनंदवनची ऊर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहे. येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्यांचा समन्वय करून देण्यात आला आहे. – उद्योगमंत्री उदय सामंत

संबंधित पोस्ट

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद

vishwatmaklokswamivarta

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत..

vishwatmaklokswamivarta