vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन

सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

 

शिर्डी, प्रतिनिधी– सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते‌. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित हेत्तीयाराची, सेवानिवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतूरे व पतसंस्था चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बागडे म्हणाले, भारतात १९०४ मध्ये सहकार कायदा झाला. त्याआधी महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे रूजली आहेत. राज्य सहकारी बँकेची सुरुवात पतसंस्थेपासून झाली आहे. पतसंस्थेच्या चळवळीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम करण्याची गरज आहे‌. सहकार क्षेत्रातील चुका लपविण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा. आजही लोकांचा सहकारावर विश्वास आहे. त्यामुळे सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीतील असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे राज्यपाल श्री. बागडे यांनी सांगितले.

सहकारात व्यापक दृष्टीकोन ठेवून आपण केले पाहिजे. ज्यांच्या ठेवींचे व्याज कमी त्या ठेवींच्या परतीची हमी असते. त्यामुळे अधिक ठेवी, अधिक व्याज ही स्पर्धा पतसंस्थांनी निर्माण करू नये, असे आवाहनही राज्यपाल श्री.बागडे यांनी केले.

संबंधित पोस्ट

पीक कर्ज वितरण आणि स्वयंरोजगारांना अर्थसहय्य यासाठी सकारात्मक काम करा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे बँकांना निर्देश*

vishwatmaklokswamivarta

ॲग्रिस्टॅक योजनाःशेतजमिन होणार आधार संलग्न-प्रत्येक तालुक्यातील एका गावात सोमवार(दि.९) पासून अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..

ब्लॅक स्पॉट” वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाय कराव्यात    — जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे  

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

भारतीय महिला संघाने ICC विश्वचषक 2025 जिंकत रचला इतिहास. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

vishwatmaklokswamivarta