vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

जालना, खेळ प्रतिनिधी:-

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (महसूल) यांच्या पत्रान्वये छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा- 2025 चे आयोजन दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे. दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता सदर स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते जालना येथील पोलिस मुख्यालय मैदानावर होणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धांचे आयोजन जालना जिल्हा मुख्यालयी करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. विभागीय महसूल स्पर्धेत मराठवाड्यातील 8 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार असुन मुख्य स्पर्धा पोलिस मुख्यालय मैदान स. नं. 488 जालना, जिल्हा क्रीडा संकुल व मत्स्योदरी महाविद्यालय, जालना येथे दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दि.12 व 13 फेब्रुवारी 2025 रोजी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.90

संबंधित पोस्ट

मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजन

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्येसरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta