vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या – गणेश सवाखंडे

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या – गणेश सवाखंडे

 

            सांगली प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले. सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय व बार्टीच्या वतीने वाळवा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सागर पाटील जुनिअर कॉलेज ढवळी व अण्णासाहेब डांगे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, आश्रम शाळा आष्टा येथे जात पडताळणी व सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य श्री. मुल्ला, प्रा. श्री. शिंदे, प्रा. श्रीमती पाटील उपस्थित होत्या.

   या प्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी साठी लागणारी कागदपत्रे व ऑनलाईन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. लवकरात लवकर विहित वेळेत विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सांगली जात पडताळणी समिती कार्यालयास सादर करून शैक्षणिक नुकसान टाळावे. समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना व बार्टी विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वाधार योजना, छ. राजर्षि शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह, छत्रपती शाहु महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना इत्यादी विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या शंकाचे निरसन केले.

यावेळी समतादूत विक्रांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जात पडताळणीची आवश्यकता का आहे? याबाबत मार्गदर्शन करून बार्टी च्या विविध योजनांची माहिती दिली.प्रास्ताविक प्राचार्य श्री. मुल्ला सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती पाटील यांनी केले. प्रा. श्रीमती माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उ

संबंधित पोस्ट

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

अन्नामृत’ची करामत…४० हजार बालकांची रोज‘अंगत पंगत’

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून भाग्यश्री सुतार आत्मनिर्भर

vishwatmaklokswamivarta

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल