vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

‘जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली, प्रतिनिधी –

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. सामंत यांनी जेएनयु विद्यापीठात भेट दिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शांतिश्री पंडित आणि छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी स्टेटस चेअरपर्सन तथा डीन प्रोफेसर अमिताभ मट्टू यांच्याशी या अध्यासनाबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती श्री सामंत यांनी दिली.

या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील. तर, पुढच्या आर्थिक वर्षात सात कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषा अध्यासनासाठी यापूर्वी आर्थिक तरतूद करण्यात आली असून यापुढेही आर्थिक तरतूद करण्यात येईल. तसेच या दोन्ही अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून इमारत बांधण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. या निधी मधील काही भाग हा ‘जेएनयु’ येथील मराठी भाषा अध्यासनासाठीही वापरला जाईल. जेएनयु च्या परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स तर्फे बांधण्याचा मानस असून जेएनयु कडून परवानगी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

दिल्लीत विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी दिल्लीतील मराठी शाळांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

‘जेएनयु’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनामधील अभ्यासक्रम याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अरविंद येलेरी आणि समन्वयक डॉ. जे. जगन्नाथन यांनी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. प्राध्यापक डॉ.मनीष दाभाडे, डॉ. राजेश खरात, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या समन्वयकाकडून छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्या माध्यमातून महाराजांचे प्रशासन, परराष्ट्रीय धोरण, व्यापार धोरण याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगितले.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठीसाठी, डॉ. दिलीप झवेरी यांचा गुजराती साहित्यकृतीसाठी गौरव

मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्वासन…

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे 

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर