vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

 

     सांगली, प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता लठ्ठे पॉलिटेक्निक, एमआयडीसी, कुपवाड, सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 या मेळाव्यात 500 पेक्षा अधिक पदाकरिता जिल्ह्यातील नामांकित अशा 12 पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. दहावी, बारावी, आय. टी. आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, विविध उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे आपला ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन प्रती सोबत घेऊन याव्यात. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायत सावळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta