vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान वाराणसीत काशी विश्वेश्वराचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान वाराणसीत काशी विश्वेश्वराचे दर्शन..

 

राज्य प्रतिनिधी-

प्रयागराज,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  प्रयागराज येथे पत्नी अमृता आणि मुलगी दीविजा यांच्यासह कुंभस्नान केले.

कुंभस्नानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, सहकुटुंब महाकुंभात येण्याचे भाग्य लाभले, याचा मला अतिशय आनंद आहे. यावर्षी १४४ वर्षांनी विशिष्ट योग आला आहे. त्या पर्वावर मला संगमावर स्नान करण्याचे भाग्य लाभले. कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. एक नवा विक्रम आणि नवा इतिहास येथे घडला आहे. ५० कोटी भाविकांनी आतापर्यंत येथे उपस्थिती लावली आहे. भारताची आस्था पाहून संपूर्ण जग आज आश्चर्यचकित आहे. हीच आपली दिव्यता, हीच आपली भव्यता, हाच आपला कुंभ आहे. हेच आमचे संस्कार आहेत, हीच आमची संस्कृती आहे. २०२७ च्या नाशिक महाकुंभाची तयारी आम्ही सुरु केली आहे.दरम्यान, प्रयागराज येथून मुख्यमंत्री फडणवीस थेट वाराणसीत गेले आणि तेथे त्यांनी सहकुटुंब काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले.

 

 

संबंधित पोस्ट

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

नवी मुंबई महानगरपालिका 23 शाळांचा निकाल 92.19% – महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश…नमुंमपा सानपाडा शाळेचा विद्यार्थी अभिराम राऊत 94.40% गुण संपादन करीत महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम..

महाबळेश्वर, माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे · अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता–अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी…

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत